Sat, Dec 07, 2019 10:10होमपेज › Marathwada › बीड : गेटचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

बीड : गेटचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

Published On: May 25 2019 7:11PM | Last Updated: May 25 2019 6:36PM
शिरूर कासार : प्रतिनिधी

शिरुर शहरातील सिध्देश्‍वर नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एक घर फोडून सोन्या -चांदीसह तब्बल सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहमद शेख उस्मान (वय ३०, रा. सिध्देश्‍वननगर, शिरुर) यांच्या घरात रात्री २ ते ३ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्या- चांदीसह नगदी दोन लाख दहा हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. 

यावेळी घरातील सर्व सदस्य झोपलेले होते. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सकाळी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून चोरी झाली असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर शिरुर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. फिर्यादी शेख मोहम्मद उस्मान यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पीएसआय जाधव हे करत आहेत.