होमपेज › Marathwada › मराठवाड्यात ऊस गाळपात बीड जिल्ह्याची आघाडी

मराठवाड्यात ऊस गाळपात बीड जिल्ह्याची आघाडी

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 08 2018 11:24PMबीड : उत्तम हजारे

सतत तीन वर्षे दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या बीड जिल्ह्याने यंदा मात्र साखरेचा गोडवा चाखला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात उसाचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळेच औरंगाबाद विभागात ऊस गाळपात बीड जिल्ह्याने आघाडी घेतली असून तीन महिन्यांत 21 लाख 10 हजार मे. टन उसाचे गाळप करीत 19 लाख 49 हजार 775 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 
औरंगाबाद विभागात एकूण 21 साखर कारखाने असून त्यामध्ये 11 सहकारी, तर 10 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागातील साखर कारखान्यांनी 52 लाख  48 हजार 613 मे. टन उसाचे गाळप केले असून 48 लाख 65 हजार 699 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. औरंगाबाद विभागाचा साखर उतारा 9.27 टक्के आहे. 

बीड जिल्ह्यात पाच सहकारी, तर दोन खासगी साखर कारखाने यंदा सुरू आहेत. तेलगाव येथील सुंदरराव सोळंके कारखान्याने चार लाख 46 हजार 400 मे. टन उसाचे गाळप करीत चार लाख 25 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. याची रिकव्हरी 9.2 आली आहे. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ कारखान्याने तीन लाख आठ हजार 162 मे. टन उसाचे गाळप करून दोन लाख 63 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याची रिकव्हरी 8.55 आली आहे. गढी येथील जय भवानी कारखान्याने दोन लाख 13 हजार 163 मे. टन उसाचे गाळप केले असून एक लाख 85 हजार 625 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. याची रिकव्हरी 8.71 आली आहे. माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याने एक लाख 77 हजार 760 मे. टन उसाचे गाळप करून एक लाख 68 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा उतारा 9.48 आला आहे. अंबाजोगाई येथील अंबा कारखान्याने एक लाख 21 हजार 129 मे. टन उसाचे गाळप केले असून एक लाख पाच हजार 325 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 8.70 आला आहे. माजलगाव तालुक्यातील जय महेश या खासगी कारखान्याने पाच लाख 67 हजार 663 मे. टन उसाचे गाळप केले असून पाच लाख 45 हजार 650 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा उतारा 9.61 आला आहे.  केज तालुक्यातील येडेश्‍वरी शुगर या खाजगी कारखान्याने  तीन लाख पाच हजार 955 मे. टन उसाचे गाळप करून तीन लाख 12 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बीड जिल्ह्यात येडेश्‍वरी कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक 10.20 आहे. 

जालना जिल्ह्यात तीन सहकारी व दोन खासगी कारखाने यंदा सुरू आहेत. या कारखान्यांनी आतापर्यंत 12 लाख 65 हजार 136 मे. टन उसाचे गाळप केले असून 11 लाख 83 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 9.36 आला आहे. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील समर्थ कारखान्याने तीन लाख 73 हजार 740 मे. टन उसाचे गाळप केले आहे. तीन लाख 53 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा उतारा 9.45 आला आहे. समर्थ युनिट दोनमध्ये दोन लाख 17 हजार 205 मे. टन उसाचे गाळप झाले असून एक लाख 98 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा उतारा 9.13 आला आहे. रामेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने एक लाख 84 हजार 607 मे. टन उसाचे गाळप करून एक लाख 62 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 8.78 आला आहे. समृद्धी शुगर या कारखान्याने दोन लाख 63 हजार 41 मे. टन उसाचे गाळप करून एक लाख 81 हजार 900 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उतारा 8.82 आला आहे. बागेश्‍वरी या खासगी कारखान्याने दोन लाख 83 हजार 190 मे. टन उसाचे गाळप केले असून दोन लाख 88 हजार 100 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 10.17  आला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात चार कारखाने यंदा सुरू आहेत. या कारखान्यांनी आतापर्यंत आठ लाख 91 हजार 25 मे. टन उसाचे गाळप करून आठ लाख 25 हजार 250 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 9.26 आला आहे. कन्नड कारखान्याने चार लाख 72 हजार 345 मे. टन उसाचे गाळप करीत चार लाख 41 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 9.35 आला आहे. संभाजी राजे या कारखान्याने एक लाख 89 हजार मे. टन उसाचे गाळप केले असून एक लाख 70 हजार 125 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 9 टक्के आला आहे. मुक्तेश्‍वर शुगर या कारखान्याने एक लाख 88 हजार 480 मे. टन उसाचे गाळप केले असून एक लाख 86 हजार 75 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचा साखर उतारा 9.87 टक्के आला आहे. घृष्णेश्‍वर शुगर या कारखान्याने 41 हजार 200 मे. टन उसाचे गाळप केले असून 27 हजार 500 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. याचा उतारा 6.67 आला आहे.