Sun, Aug 09, 2020 11:30होमपेज › Marathwada › परसबाग चालकांसाठी 100 पिल्‍लांची योजना ठरतेय वरदान

परसबाग चालकांसाठी 100 पिल्‍लांची योजना ठरतेय वरदान

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 8:29PMपरभणी : नरहरी चौधरी 

जिल्हा परिषदेच्या पशुसवंर्धन विभागामार्फत परभणीत पोल्ट्रिफार्म चालविला जातो. याअंतर्गत परसबागेत कुक्कुट पालन करणार्‍यांसाठी 100 पिल्‍लांची योजना राबवली जाते. वर्षात तब्बल सव्वाशे लाभार्थी निवडून त्यांना ही पिल्‍ले मोफत दिली जात असल्याने त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असून त्यांचे उत्पन्‍न वाढविण्यासाठी लाभदायक ठरत आहे. 

परभणी शहरातील गंगाखेड रोडवर एक जिल्हा परिषदेचे पोल्ट्री फार्म आहे. मागील अनेक वर्षांपासून येथून परसबाग चालकांसाठी 100 पिलांची योजना राबवली जाते. दरवर्षी सव्वाशे लाभार्थी निवडले जातात. या लाभधारकांना पिल्‍ले वाटप करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत तरतूद केली गेली आहे. या निधीतून त्यांना मोफत पिल्‍ले वाटप केले जातात. या पिल्‍लांमध्ये तब्बल 50 ते 75 कोंबड्या असणे आवश्यक आहे. अर्धे नर व अर्धे मादी असतात. या पिलांसाठी प्रादेशिक अंडी उबवण केंद्र हे औरंगाबाद येथील पडेगाव येथे आहे. येथून जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्याला पिल्‍ले दिली जातात. 

मागील दहा वर्षांत गिरीराज व वनराज या जातींची पिल्‍ले उपलब्ध केली होती. नागपूर विभागातून स्वर्णधारा, ब्लॅक अ‍ॅस्ट्रॉलॅब या दोन अतिरिक्‍त जाती 2012 ते 15 या कालावधीत परभणीत आणल्या गेल्या होत्या. या चार जातीचे संकर होऊन ग्रामीण भागात जी कुक्कुट पैदास होत आहे ती विविध ढंगी होत असून गावरान सदृश्य दिसत असल्याने त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली.