Sat, Jul 11, 2020 14:44होमपेज › Marathwada › अंबाजोगाई : शासकीय कृषी तंत्र विद्यालयाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न 

अंबाजोगाई : शासकीय कृषी तंत्र विद्यालयाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न 

Published On: Jul 18 2019 7:21PM | Last Updated: Jul 18 2019 7:14PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई येथील शासकीय कृषी तंत्र विद्यालयाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला. ही घटना  काल (ता.१७) घडली. कार्यालयास आग लागल्याचे पाहून शेजारी असणाऱ्या वसतिगृहातील व्यक्तींनी पाणी टाकून आग विझवली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. 

शासकीय कृषी तंत्र विद्यालयाच्या कार्यालयाची खिडकी तोडून आत ऑईल टाकून कार्यालयाचे नुकसान व्हावे या उद्देशाने जाळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केला. आग लागून खूर्ची व फोन वायर जळाले आहे. यात सहा हजार रूपयाचे नुकसान झाले. आग लागल्याचे पाहून शेजारच्या वसतिगृहातील व्यक्तीनी पाणी टाकून आग वेळीच विझवली. 

 प्राचार्य अंकुश मोरे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस जमादार बी. यु. नागरगोजे अधिक तपास करत आहेत.