Wed, Jul 08, 2020 09:17होमपेज › Marathwada › आईच्या मृत्युचं दु:ख सहन न झाल्याने मुलाची आत्‍महत्‍या

आईचा मृत्यू सहन न झाल्याने मुलाची आत्‍महत्‍या

Published On: Jan 14 2019 5:06PM | Last Updated: Jan 14 2019 5:06PM
अहमदपूर : प्रतिनिधी 

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील गजानन अण्णाराव कोंडलवाडे (वय २७) यांनी आईच्या मृत्यूनतंर सरणावरची राख सावडलेल्या दिवशी रात्री त्याच ठिकाणी जाळून घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना घडली आहे.

शिरुर ताजबंद येथील सत्यभामाबाई अण्णाराव कोंडलवाडे यांचा  शुक्रवारी दि.११ रोजी मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी स्वत: च्या शेतामध्ये अंत्यसंस्‍कार करण्यात आले. आईच्या मृत्यूचे दु:ख पचविणे गजानन यास असाहय झाले आणि रविवारी सकाळी दूध घालण्याचा कार्यक्रम झाला परंतु आईचा विरह सहन होत नसल्याने गजानन यांने रात्री साडे अकराच्या दरम्यान स्वत :च्या कार (क्र. एमएच २४ ई ५७५०) मध्ये चोबळी रोडवरील शेतात जाऊन आईच्या सरणाच्या ठिकाणी जाळून घेतले. यानंतर कारचा सांगडा तेवढाच राहिला होता. 

गजाननच्या पश्चात वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. सदरील घटनेतमुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. अहमदपूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मित मुत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एम गित्ते करीत आहेत.