Mon, Aug 03, 2020 14:24होमपेज › Marathwada › बीड : पिकअप ट्रक आणि ट्रकच्या अपघातात एक ठार   

बीड : पिकअप ट्रक आणि ट्रकच्या अपघातात एक ठार   

Last Updated: Jan 17 2020 1:14AM
अर्धामसला (बीड) : प्रतिनिधी 

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावाशेजारी पीकअप जीप आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. मयत प्रसाद गायके (वय 45) औरंगाबाद येथील आहेत. 

अधिक वाचा : शेतकर्‍याची जाळून घेऊन आत्महत्या

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील अर्धामसलाजवळ बुधवारी (ता.१५) रोजी दुपारी तीनच्या सुमारास भीषण अपघात घडला. यात कल्याणमधील एक जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान ट्रक माजलगावडे जात होता व पीकप ट्रक माजलगावकडुन पुढे जात होता. अर्धामसला गावाजवळ येताच अंदाज न आल्याने दोघांची समोरासमोर धडक झाली.