Sun, Oct 25, 2020 07:44होमपेज › Marathwada › वाशिम : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वाशिम : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Last Updated: Sep 18 2020 5:22PM
वाशिम : पुढारी वृत्तसेवा  

स्थानिक सिंधी कॅम्प परिसरातील एका व्यावसायिकाने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिचा विनयभंग केला. या संदर्भातील आरोपीवर वाशिम शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

प्राप्त माहितीनुसार, सिंधी कॅम्प परिसरातील एका व्यावसायिक पिरू उर्फ प्रकाश बसंतवाणी (वय ५०) याने त्याच परिसरातील एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस गुरुवारी (दि. १७) रोजी दुपारी पळवून नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीस तिच्या घराजवळ नेवून सोडून दिले. 

अधिक वाचा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह 

त्यांनतर सदर मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई -वडिलांना सांगितला. यानंतर पिडीत मुलीसह आई- वडिलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. आणि या संदर्भात गुरूवारी रात्री शहर पोलीसात तक्रार दाखल केली. यानुसार या घटनेतील आरोपी पिरू उर्फ प्रकाश बसंतवाणी यांचावर भादवी ३६३, ३५४ सहकलम ८ /१२ पोक्सो अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. याच दरम्यान वरील कारणावरून गुरुवारी सांयकाळी एकाच समाजातील दोन गटात हाणामारी झाल्याने या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.  

अधिक वाचा :लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर साताऱ्याचा जवान शहीद

 "