Thu, Jul 09, 2020 07:03होमपेज › Marathwada › हुंड्यासाठी दोन चिमुकल्यांसह विवाहितेची हत्या 

हुंड्यासाठी दोन चिमुकल्यांसह विवाहितेची हत्या 

Last Updated: Dec 02 2019 8:27PM

मयत रंजना शरद पवळे, मुलगा दिग्वीजय शरद पवळे, मुलगी कु.वैभवी शरद पवळेकंधार : प्रतिनिधी 

घर बांधण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये आनत नाही म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन  शेतालगतच्या विहरीत ढकलून देवून हत्या करण्यात आली आहे. इतकेच नाही तर विवाहितेसह दोन चिमुरड्यांचीही हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात संतापाची लाट असून मयतचा भाऊ व्यंकटेश बालाजी ढगे (रा. ईज्जतगाव (प.)) यांनी कंधार पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, मयत रंजना (वय २७ वर्ष) हिचा विवाह २००९ मध्ये गोणार येथील शेती व्यवसाय करणारा शरद पवळे याच्या सोबत झाला होता. त्यांना दिग्वीजय शरद पवळे (वय ९ वर्ष) आणि कु.वैभवी शरद पवळे (वय ६वर्ष) असे दोन अपत्य होती. वेळोवेळी सासरचे मंडळी व पती शरद  'घर बांधकामासाठी ३ लाख रुपये घेऊन ये म्हणून रंजनाचा छळ करत असे. याबाबत माहेरच्यांना रंजना हिने दिवाळीच्या सुट्टीला घरी गेल्यावर कानावर घातली होती. त्यावेळी वडीलांनी मयत रंजनाची समजूत काढत तीला सासरी सोडले होते. 

पण आता रविवारी सायंकाळी (१ डिसेंबर २०१९ रोजी) मयत रंजना शरद पवळे, मुलगा दिग्वीजय शरद पवळे, मुलगी कु.वैभवी शरद पवळे यांचा मृत्यू देह शेताशेजारील विहीरीत आढळला. सासरच्या मंडळीनी संग्णमत करुन बहीण रंजना व दोन लेकरांना  मारुन विहीरीत टाकल्याची फिर्याद भाऊ  व्यंकटेश ढगे याने पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून पती शरद पंडीत पवळे, सासरा-पंडीत नारायण पवळे, सासू- मैनाबाई पंडीत पवळे, भाया-मनोहर पंडीत पवळे आणि जाऊ- सुनिता मनोहर पवळे या  पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव हे करत आहेत.

मात्र या घटनेतील हत्या की आत्महत्या हे गुढ कायम आहे. मयत रंजनाच्या आरोपीतांना तात्काळ अटक केले जात नाही, तोपर्यंत शव ताब्यात घेतले जाणार नाही अशी भुमिका माहेरच्या मंडळींनी घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. मात्र रात्री एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.