Tue, Sep 22, 2020 11:04होमपेज › Marathwada › बुलढाण्यात ८० कोरोना पॉझिटिव्ह 

बुलढाण्यात ८० कोरोना पॉझिटिव्ह 

Last Updated: Aug 01 2020 8:42PM
बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात आज (शनिवार) प्रयोगशाळेकडून 72 व रॅपीड अॅन्टीजेन किट च्या माध्यमातून 8 असे एकूण 80 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1348 वर पोहोचला आहे. 

दरम्‍यान आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 830 जणांना रूग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील मृत रूग्णांची संख्या 30 झाली आहे. सद्या कोविड रूग्णालयात 488 रूग्ण  उपचार घेत आहेत. कोरोना संशयित 118 रूग्णांच्या स्वॅबचे  अहवाल प्रयोगशाळेकडून  प्राप्त व्हावयाचे आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. 

 "