Wed, Jul 08, 2020 15:10होमपेज › Marathwada › परळीच्या रेल्वेस्थानकावर आठ किलो गांजा हस्तगत

परळीच्या रेल्वेस्थानकावर आठ किलो गांजा हस्तगत

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 1:32AMपरळी : प्रतिनिधी 

परळीच्या रेल्वेस्थानकावर आठ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. रेल्वे फलाटावर एकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने  चौकशी केल्यावर रेल्वे पोलिसांना गांजाची पिशवी आढळून आली. या प्रकरणी पोलिस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा केला आहे.  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रेल्वे स्थानक येथे कुंडलिक बाबूराव सुरवसे  (रा. कारेपूर जि. लातूर) हा  एक पिशवी घेऊन थांबलेला होता. रेल्वे पोलिस टेहळणी करताना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली, तेव्हा कुंडलिकजवळ असलेल्या पिशवीमध्ये गांजा आढळून आला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी पिशवी हस्तगत करून  त्याला ताब्यात घेतले. तपासणीत आठ किलो आठ ग्रॅम गांजा किंमत सुमारे 26 हजार रुपये आढळून आला आहे.

पोलिस व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा केला आहे. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप गोढाणे, जमादार चोपडे, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, मंडळ अधिकारी राजुरे आदी उपस्थित होते.