Wed, Sep 23, 2020 01:41होमपेज › Marathwada › मराठवाड्यात संख्या 8,000 हजारांवर

मराठवाड्यात संख्या 8,000 हजारांवर

Last Updated: Jul 03 2020 12:11AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

मराठवाड्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 8 हजारांच्या पुढे गेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी आलेल्या अहवालानुसार परीक्षण करण्यात आलेल्या 1200 स्वॅबपैकी 206 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यात 122 पुरुष, 83 महिला व अन्य एक आहेत. शिवाय जालन्यातही 40 नवे रुग्ण सापडले आहेत.

औरंगाबाद मनपा हद्दीतील दिवसभरातील रुग्णसंख्या 171 होती. शहरातील बहुतांश सर्वच भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. आतापर्यंत कोरोनामुळे 277 जणांनी जीव गमावला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 2860 रुग्णांवर उपचार सुरू असून,  2857 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. रांजणगाव, बेगमपुरा, आविष्कार कॉलनी, हर्षनगर, सुभाषचंद्र बोसनगर व सिल्‍लोड तालुक्यातील एक बाधित गुरुवारी मरण पावला. 

उस्मानाबाद, परभणी, जालना जिल्ह्यातही बाधितांची संख्या वाढली आहे. जालन्यात उपचार घेत असलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत सहाजण पॉझिटिव्ह सापडले आहेत. परभणीत चार नवे बाधित सापडले आहेत. नांदेडात सात जणांना डिस्चार्ज मिळाला असून, सातजण नव्याने सापडले आहेत. वाढत्या संसर्गामुळे औरंगाबादेत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असाच निर्णय बीड, परभणी, जालना प्रशासनानेही घेतला आहे.

 "