Sat, Jul 04, 2020 05:12होमपेज › Marathwada › सरकारच्या तिजोरीत ७ कोटींचा महसूल जमा

सरकारच्या तिजोरीत ७ कोटींचा महसूल जमा

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:22PMगेवराई : विनोद नरसाळे

तालुक्यात 2017-18 या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खननातून जवळपास 7 कोटींचा महसूल तहसीलकडे प्राप्त झाला आहे. हा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे. तर सरकारची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांकडून गेवराई तहसील कार्यालयाने सर्वाधिक 76 लाख 63 रुपये दंड करून तो वसूल देखील केला आहे. 

गौण खनिज उत्खनन, खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामधून शासनाला कोट्यवधीचा महसूल शासन तिजोरीत जमा होतो. गेवराई तालुक्यात उत्तरेकडून गोदावरी नदी गेलेली आहे, तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने यासाठी मुरूम, माती, खडी तसेच वाळू, गारगोटी व स्टोनक्रेशर आदी गौण खनिज उत्खनातून शासनाला गत आर्थिक वर्षात 6 कोटी 93 लाख 27 हजार 842 हजारांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे, तसेच अनेक जण प्रशासनाची परवानगी न घेता चोरट्या पद्धतीने विविध मार्गावर बिनधास्त गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या वाहनावर एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या एका वर्षाच्या कालावधीत 76 लाखांचा दंड करुन वसूल केला आहे.

76 लाखांचा दंड

अवैध वाळू वाहतुकप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले.  शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकावर एक वेळा वाळू माफियांनी हल्ला केला होता. दंडापोटी 76 लाखांचा महसूल जमा झाला आहे.

भरारी पथकाची जबाबदारी

अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खननासह निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक खडीचे उत्खनन करण्यात येत आहे.  भरारी पथकाने दक्ष  धाडसत्राची मोहिमच राबवायला हवी  असे मत सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने व्यक्त करण्यात येते.
 

Tags : beed, Gevrai news, revenue, collection,