वाशिम : पुढारी वृत्तसेवा
वाशिम जिल्ह्यात १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. त्याप्रमाणे केद्राने पाठवलेल्या डोस पैकी जिल्ह्याला कोरोनाच्या लसीचे ६५०० डोस वाट्याला आले होते. ते आज (दि. १४) जिल्ह्यात पोहचले आहेत.
वाचा : नांदेड : लोहा : तर 'त्या' ४६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
वाशिम जिल्ह्यात सर्वात आधी फ्रंट लाईन वॉरियर म्हणून ६५०० आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ४ केंद्रावर हे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशील्ड लस रात्री ११.३० पोहचली. या क्षणाचा वाट पाहणाऱ्या आरोग्य विभागाने लस घेऊन येणाऱ्या व्हॅनचे हार घालत नारळ फोडून स्वागत केले. आरोग्य विभाग लसीकरणासाठी सज्ज असून १६ तारखेला प्रत्यक्षात लसीकरण होणार असल्याने आरोग्य कर्मचारी उत्साही दिसत आहेत.