Mon, Sep 21, 2020 11:04होमपेज › Marathwada › नांदेडमधील कोरोना बळींची संख्या २३ वर

नांदेडमधील कोरोना बळींची संख्या २३ वर

Last Updated: Jul 08 2020 12:50PM

संग्रहित छायाचित्रनांदेड : पुढारी वृत्तसेवा

नांदेड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असून बुधवार (ता.८) सकाळी आणखी ९  पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर कंधार तालुक्यातील सोनमळा तांडा उमरज येथील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. यामुळे नांदेडमधील कोरोनाने बळींची संख्या २३ झाली आहे.

अधिक वाचा :  देशात २४ तासांत ४८२ जणांचा मृत्यू 

नांदेड शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची मालिका सातत्याने सुरूच असून बुधवारी (दि. ८) जुलै रोजी शहरातील सिडको, सावित्रीबाई फुले नगर, कंधार तालुक्यातील काटकळंबा , मुखेड तालुक्यातील तगलाईन गल्ली, देगलूर, परभणी जिल्ह्यातील वस्सा, गांधीनगर बिलोली, गोकुंदा ता.किनवट आदी ठिकाणी पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

 "