Fri, Sep 25, 2020 14:46होमपेज › Marathwada › आदरणीय मुख्यमंत्रीजी माझ्या पप्पांचा पगार वाढवा; पहिलीच्या चिमुकलीचे पत्र

आदरणीय मुख्यमंत्रीजी माझ्या पप्पांचा पगार वाढवा; पहिलीच्या चिमुकलीचे पत्र

Last Updated: Dec 14 2019 2:21PM
वडीगोद्री (जि.जालना) : प्रतिनिधी  

आदरणीय मुख्यमंत्रीजी माझ्या पप्पांचा पगार वाढवाना. मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील. अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका चिमुरडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या वडिलांच्या मदतीसाठी एक पत्र लिहिले आहे. गेल्या काही वर्षापासून मुलीचे वडील एसटी महामंडळातील नोकरी करत आहेत. परंतू, एका कच्च्या घरात राहणारी मुलगी तिच्या वडिलांची स्थिती पाहू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहून तिने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.

धाकल गावात राहणाऱ्या या चिमुकलीचे नाव श्रेया सचिन हराळे असे आहे. ती अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयात इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत आहे. या चिमुकलीचे वडील गेल्या नऊ वर्षांपासून एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करत आहेत. त्यांची अंबड आगारामध्ये २०११ पासून नियुक्ती आहे. या चिमुकलीचे वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहतात. त्यामुळे तिची आणि वडिलांची भेट ही दुर्मिळच झाली आहे. वडील कामावरून रात्री उशिरा येतात तेव्हा ही झोपलेली असते. कधी कधी अनेक दिवस दोघांची भेटसुद्धा होत नाही. त्यामुळे आपल्या वडिलांची भेट व्हावी, त्यांनी आपल्या सोबत खेळावे असे नेहमी वाटते. पण असे होत नाही.

अंबड आगारामध्ये एसटी वाहकाच्या चिमुकल्या मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आपलं गाऱ्हाणं मांडल आहे. कमी पगार असल्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी बाबांना करावा लागणारा ओव्हर टाईम आणि त्यामुळे आपल्याला वेळ देता येत नसल्याची तक्रार या चिमुकलीने आपल्या पत्रामध्ये केली आहे. बाबांना सध्या पगारातून कपात होऊन ३५०० रुपयेच पगार मिळतो. बाबांचा पगार वाढवला तर त्यांना ओव्हर टाइम करावा लागणार नाही आणि मला वेळ देता येईल, अशी विनंती देखील या पत्रात तिने केली आहे.

 काय लिहिलंय पत्रामध्ये ?

श्रेया सचिन हराळेने लिहिले मा. मुख्यमंत्र्यांना पत्र, 

आदरणीय मुख्यमंत्री जी,

माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे. मी मत्स्योदरी स्कूल अंबड येथे १ ली च्या वर्गात शिकते, पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात. मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात "सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो माझा पगार कमी आहे," म्हणून आदरणीय मुख्यमंत्री जी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पपांचा पगार वाढवा ना. मग माझे पप्पा मला शाळेत सोडायला येतील आणि ओव्हर टाइम करणार नाही. माझे पप्पा खूप चांगले आहेत.

या चिमुरड्या मुलीला जरी घर, संसार, खर्च, महागाई यासारख्या दैणदीन जीवनातील वास्‍तवाची समज जरी नसली तरी, तिच्या इवल्‍याशा समजदारीतून मुख्यमंत्री साहेबांना लिहिलेलं पत्रं सध्याच्या धावपळीच्या जगातील वास्‍तव. घर चालवण्यासाठी कत्‍या पुरषाला करावी लागणारी कसरत त्‍यातुन कुटुंबापासून होणारा दुरावा. याच चित्रणच जणू या पत्रातून समोर येत आहे. 

त्‍यातचं काही दिवसांपूर्वी सरकार भिकार आहे. नोकरदारांला मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पगार वाढत नाही, अधिकारी अधिकार बजावत असतात. पगार तोकडा, महागाई मोठी, या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. अशा  आशयाची चिठ्ठी लिहून सातारा जिल्ह्यातील दहिवडी आगारात काशिनाथ वसव या चालकाने चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 "