Wed, Jul 08, 2020 15:20होमपेज › Marathwada › ट्रक-ट्रॅक्टर अपघातात १५ जखमी, ७ गंभीर

ट्रक-ट्रॅक्टर अपघातात १५ जखमी, ७ गंभीर

Published On: Feb 22 2019 2:02AM | Last Updated: Feb 22 2019 2:02AM
तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजाभवानीचे दर्शन करून चुकीच्या मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरने सोलापूरकडे जाणार्‍या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांतील पंधरा लोक जखमी झाले आहेत. त्यातील सात कामगार गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे.

रामदारा तलावापासून जाणारा चारपदरी राष्ट्रीय महामार्ग येथे अपघात घडला आहे. आरेवाडीमार्गे तुळजाभवानी देवीचे दर्शन करून बीडकडे जाणारा ऊसतोड कामगारांचा ट्रक चुकीच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर घुसला. त्याचदरम्यान उस्मानाबादकडून सोलापूरकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच 16 सी 7878  याला विरुद्ध दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच 44 सी 327 याने जोरदार धडक दिली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी आणि गोटेगाव येथील हे ऊसतोड कामगार आहेत. यामध्ये सात पुरुष, दोन बालके, एक मुलगी व सहा महिला यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झाल्याने उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये बारगजे बबन वैजनाथ (वय 40), ज्योती बळीराम माने (वय 25), राधा कृष्ण वायकर (वय 8), अंगद प्रल्हाद वायकर (वय 30),  पांडुरंग गायकवाड (वय 40),  सविता वायकर (वय 27), बाळू माने (वय 30) यांचा समावेश आहे.  तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्यामध्ये सिद्धेश्‍वर सुभाष घुले (वय 12), दैवशाला सुभाष घुले (वय 35),  दत्तू शिरसाट (वय 45), बळीराम छगन माने (वय 34), उत्तरेश्‍वर गौतम कांबळे (वय 25), शिवकन्या माने (वय 25), बालाजी माने (वय 25), मीरा अंगद वायकर (वय 30) यांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर तुळजापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचार्‍यांनी सर्व जखमींना तुळजापूर शासकीय रुग्णालयामध्ये आणून दाखल केले. पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणले. 

दरम्यान, तुळजाभवानी मंदिराकडून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवून हा अपघात झाला आहे, असे उपस्थितांनी सांगितले. जोरदार धडक झाल्याने दोन्ही अवजड वाहने समोरून चक्काचूर झाली होती. दोन्ही वाहने वेगवान असल्याने सर्व लोक जखमी असून जखमींमधील पांडुरंग गायकवाड हे ट्रकचे चालक आहेत.