Mon, Aug 03, 2020 14:47होमपेज › Marathwada › अंबाजोगाई : शेततळ्यात पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

अंबाजोगाई : शेततळ्यात पडून मुलाचा मृत्यू

Last Updated: Oct 09 2019 4:32PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

शेततळ्यात पडलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे बुधवारी (दि. ९) दुपारी एकच्या दरम्यान घडली. प्रतिक बाळासाहेब यादव (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अंबाजोगाई येथील व्यंकटेश विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. बुधवारी त्याने प्रथम सत्राची तोंडी परीक्षा दिली होती. त्यानंतर तो गावाकडे गेला होता.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत प्रतीक बाळासाहेब यादव व त्याचा मित्र जाधव हे दोघेजण बुधवारी  गावातील शाळेजवळ पतंग उडवत होते. खेळताना पतंग तुटला व जवळच असलेल्या संदिपान शिंदे यांच्या शेतामधील शेततळ्यात पडला. पतंग काढण्यासाठी प्रतीक प्रयत्न करत असताना अचानक त्याचा पाय घसरून तो थेट शेततळ्यात पडला. प्रतीकला पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. 

दरम्यान, घटनास्थळी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रतिक यादव याच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.