होमपेज › Marathwada › चंद्रपूर : सुमो जिपचा अपघात; 1 ठार, 9 गंभीर 

चंद्रपूर : सुमो जिपचा अपघात; 1 ठार, 9 गंभीर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वसमत : प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील वाघाळा येथुन चंद्रपुर देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या टाटा सुमो जिपचा मध्यरात्री (२७ मार्च) अपघात झाला. या अपघातात एक महिला ठार झाली असून ९ जण गंभीर जखमी आहेत. टाटा सुमो भेंडेगाव रेल्वे फाटकाजवळ आयशरने अचानक ब्रेक लावताच त्यावर आदळुन हा अपघात झाला. 

वसमत- औंढा नागनाथ मार्गावरील भेंडेगाव रेल्वे फाटका जवळ  रात्री आयशर क्र. एम. एच. 26 एच. 8677 च्या चालकाने अचानक ब्रेक लावताच पाठीमागून येणारी टाटा सुमो क्र. एम. एच. 28 व्ही. 0159 ही आयशर वर जोरात आदळली. या अपघातात जिप मधील गोदावरी पुंजाराम मुळे (वय 65) वर्ष ही महीला जागीच ठार झाली. तर विठ्ठल मुळे, रामप्रसाद आघाव, पुंजाराम मुळे, मंदोधरी मुळे, इंद्राबाई मुळे, कोंडाबाई बोंडे, शालुबाई कांजणे, शालाबाई बोंडे, आशामती जाधव सर्व राहणार वाघाळा तालुका मंठा जिल्हा जालना हे 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे फौजदार प्रशांत भुत्ते, जमादार शंकर इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना नांदेड रूग्णालयात हलवण्यात आले. तर काही जणांवर वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालु आहे. हे भाविक वाघाळा येथुन चंद्रपुर येथे देवी दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. पोलिसांनी आयशर चालक ज्ञानोबा जकवाड (रा. कंधार जि. नांदेड) याला ताब्यात घेतले आहे.

Tags : Accident, Dead, Injured, Police, Crime, Chandrpur, Marathwada, Tata sumo, Eicher truck


  •