Mon, Jul 06, 2020 22:40होमपेज › Marathwada › नांदेडमध्ये ४७ हजारांचा गुटखा जप्त  

नांदेडमध्ये ४७ हजारांचा गुटखा जप्त  

Published On: Sep 28 2019 2:04PM | Last Updated: Sep 28 2019 1:02PM

संग्रहित छायाचित्रहाणेगाव (नांदेड) : प्रतिनिधी

देगलूर तालुक्यातील मरखेल पोलिस स्टेशन अंतर्गत हाणेगाव येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी औराद- हाणेगाव या मार्गाने जाणाऱ्या अवैधरित्या गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली. यात पोलिसांनी जवळपास ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या घटनेचा पुढील तपास मरखेल पोलिस करत आहेत.