Sun, Jul 12, 2020 15:42होमपेज › Marathwada › गोदेचे पाणी गुजरातला पळविण्याचा घाट: राज ठाकरे 

गोदेचे पाणी गुजरातला पळविण्याचा घाट : राज ठाकरे 

Published On: Apr 12 2019 7:38PM | Last Updated: Apr 12 2019 8:08PM
नांदेड : प्रतिनिधी 

गोदावरीचे पाणी गुजरातला पळविण्याचा घाट सरकारने आखला आहे. या दृष्टीने योजनाही तयार झाली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रश्‍नावर काहीच बोलू शकणार नाहीत, असे प्रतिपादन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नांदेड येथे केले.

गोदावरीचे पाणी मराठवाडा, नगर, नाशिक जिल्ह्यांना मिळते. पाणी वाटपावरून वाद असताना गोदावरीचा फायदा गुजरातला कसा होईल, याचा आराखडा तयार करण्यात येत आहेे. या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमती देतील. कारण बसविलेला मुख्यमंत्री काहीच बोलू शकत नाही, असे ते म्हणाले. राज्यातील 24 हजार गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाली आहेत. 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 14 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे असताना राज्य सरकारने आखलेल्या पाणी योजना कुठे आहेत, असा सवाल राज यांनी केला.

मतांच्या बेगमीसाठी सैनिकांच्या हौतात्म्याचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांच्या नावावर मते मागताहेत. तुम्ही पाच वर्षांपूर्वी देशाला जे स्वप्न दाखवले त्यावर मते मागा. मात्र, मतांच्या     नांदेड, प्रतिनिधी : गोदावरीचे पाणी गुजरातला पळविण्याचा घाट सरकारने आखला आहे. या दृष्टीने योजनाही तयार झाली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रश्‍नावर काहीच बोलू शकणार नाहीत, असे प्रतिपादन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नांदेड येथे केले.

शहरातील नवीन मोंढ्यातील मार्केट कमिटीच्या मैदानावर शुक्रवारी (दि.12) सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते.गोदावरीचे पाणी मराठवाडा, नगर, नाशिक जिल्ह्यांना मिळते. पाणी वाटपावरून वाद असताना गोदावरीचा फायदा गुजरातला कसा होईल, याचा आराखडा तयार करण्यात येत आहेे. या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमती देतील. कारण बसविलेला मुख्यमंत्री काहीच बोलू शकत नाही, असे ते म्हणाले. राज्यातील 24 हजार गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाली आहेत. 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 14 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे असताना राज्य सरकारने आखलेल्या पाणी योजना कुठे आहेत, असा सवाल राज यांनी केला.

देशाची वाटचाल रशियन हुकूमशाहीकडे...

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राज यांनी टीकेचे लक्ष्य केले. सध्या आपल्या देशाची रशियाकडे वाटचाल सुरू आहे. रशियात चार-पाच लोकांच्या हातात सत्ता एकवटली आहे. बाकी असतात सगळे गुलाम. आपण गुलाम होणार का? असा सवाल राज यांनी उपस्थितांना विचारला. जर्मनीत हिटलर हा रेडिओवरून लोकांशी संवाद साधत असे. मन की बातचा उगम हिटलरशाहीत आहे अशी टीका त्यांनी केली.