होमपेज › Marathwada › पिकअप-आयशरचा अपघात; चार जखमी 

पिकअप-आयशरचा अपघात; चार जखमी 

Published On: Aug 05 2019 3:55PM | Last Updated: Aug 05 2019 11:24AM
जालना (मराठवाडा) : प्रतिनिधी 

जालना-बदनापूर येथे पिकअप गाडीचा ( MH17 BY3446) अपघात झाला आहे. यामध्‍ये एक गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  हा अपघात रात्री २.३० वाजता घडला आहे. 

पिकअप अपघातात जखमी झालेल्‍या जखमींना मदत करण्‍यासाठी अक्षय बाबूलाल पेंढारकर,  अजय पेंढारकर व  निरंजन पेंढारकर हे तरुण मदतीला धावले. मदत कार्य सुरु असताना अपघात झालेल्‍या पिकअपला आयशरने (MH20BT 2345 ) जोरदार धडक दिली. यामुळे या अपघातात अक्षय पेंढारकर गंभीर जखमी झाला आहे.  जखमींना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.