Mon, Aug 10, 2020 05:32होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ३ कोरोनाग्रस्त

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ३ कोरोनाग्रस्त

Last Updated: May 15 2020 10:52AM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्ह्यात ३ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. काल रात्री उशिरा मिरज येथून ७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ७१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील २ व रत्नागिरी तालुक्यातील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. रत्नागिरी नर्सिंग सेंटर १ तसेच संगमेश्वर येथील देवळे १ व भडकंबा १ येथील हे रुग्ण आहेत. या अहवालानंतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७७ झाली आहे.

वाचा - श्रमिक ट्रेनने कोकणातून 2880 कामगार परराज्यात

रत्नागिरी : पळालेला कोरोनाबाधित अखेर सापडला