Wed, Aug 12, 2020 08:39होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार जिल्ह्यात

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार जिल्ह्यात

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:23PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणार्‍या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफटाइम हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीची संजीवनी आणि माजी मुख्यमंत्री तथा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे यांचे स्वप्नपूर्ती म्हणजे कुडाळ तालुक्यातील पडवे येथे साकरलेले लाईफटाईम हॉस्पिटल. या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी सकाळी 11 वा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे व अन्य मंत्री तसेच राज्यातील प्रसिद्ध व सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर व उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

82 एकर क्षेत्रात वसलेल्या या लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांना माफक दरात उच्च आणि अद्ययावत अशी रुग्णसेवा देण्याचे ध्येय खा. नारायण राणे यांनी ठेवले आहे. या रुग्णालयात रुग्ण सेवा हाच धर्म असेल, या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण खडखडीत बरा होवून परत आपल्या घरी जाणे हेच आपले ध्येय आहे, असा विश्‍वास या रुग्णालयाचे सर्वेसर्वा खा. नारायण राणे यांनी दिला आहे. ओरोसजवळ उद्या कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.