Mon, Aug 10, 2020 04:28होमपेज › Konkan › सेनेला खात्री तर भाजपने फोडले फटाके

सेनेला खात्री तर भाजपने फोडले फटाके

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 12:52AM
रत्नागिरी : 

शहराच्या प्रभाग क्र.3 च्या पोटनिवडणुकीतील मतदानानंतर शिवसेनेचे उमेदवार राजन शेट्ये यांना 1 हजार ते 1100 मते मिळून विजयी होऊ, अशी खात्री वाटत आहे. तर दुसर्‍या बाजूला भाजपचे उमेदवार वसंत पाटील हेच विजयी होतील, याचा विश्‍वास असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले. प्रभाग क्र. 3 च्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. गुरुवारी मतमोजणी होणार आहे. शिवसेना-भाजपने ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची केली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचार होताना काय केले जातेेय? हे गुप्त ठेवण्यात आले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रमुख मंडळींना परस्परांबाबत कोणतेही फोडाफोडीचे राजकारण करता आले नाही. या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्येच खरी लढत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सनिफ गवाणकर यांनाही चांगली मते मिळतील, असा विश्‍वास वाटत आहे. मात्र, शिवसेनेच्या राजन शेट्ये यांना मतदान झालेल्या 1 हजार 908 मतांपैकी 1000 ते 1100 मते मिळतील, अशी खात्री वाटत आहे.