Fri, Nov 27, 2020 22:51होमपेज › Konkan › दहा कलमबागा आगीत खाक

दहा कलमबागा आगीत खाक

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 10:08PMदेवगड : प्रतिनिधी

लिंगडाळ -कोटकामते येथील कोटकामते देवइनाम जागा याठिकाणी असलेल्या रवींद्र महादेव खाजणवाडकर यांच्या जागेत  महावितरण कंपनीमार्फत ठेकेदाराचे कामगार इलेक्ट्रिक पोल गॅस कटरने कापत असताना घर्षणाने पडलेल्या आगीची ठिणगी रानगवतावर पडून लागलेल्या आगीत 10 कलमबागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे 40 लाखांचे नुकसान झाले. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वा.च्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, कोटकामते देवइनाम जागा याठिकाणी असलेल्या रवींद्र महादेव खाजणवाडकर यांच्या जागेत असलेला इलेक्ट्रिक पोल महावितरण कंपनीमार्फत ठेकेदार ज्योतिबा लक्ष्मण पाटील यांचे प. बंगालमधील चार कामगार  शनिवारी पोल कापत असताना ही घटना घडली. अग्‍नितांडवामध्ये 10 बागमालकांच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे 40 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले.

यामध्ये नामदेव गोपाळ मसुरकर यांची 250 आंबा व 180 काजुकलमे (नुकसान 8 लाख), सुनंदा रावजी खाजनवाडकर 300 आंबा कलमे (नुकसान 10 लाख), रवींद्र महादेव खाजनवाडकर 200 आंबा कलमे (6 लाख), वसंत भिवसेन मसुरकर काजू 50 व  आंबा 150 कलमे (5 लाख), वासूदेव दत्ताराम मसूरकर 100 आंबा कलमे (3 लाख), कल्याणी विठ्ठल मसूरकर 100 आंबा कलमे (3 लाख), विष्णू भिवसेन मसूरकर 250 आंबा कलमे (5 लाख), नागेश यशवंत लोके 10 कलमे (25 हजार), अशोक गणपत वाळके 22 कलमे (60 हजार) यांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच मारुती शंकर गोसावी व लक्ष्मण शांताराम गोसावी यांच्या बागांनाही आगीची झळ बसून नुकसान झाले. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात नामदेव गोपाळ मसूरकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार  ठेकेदार ज्योतिबा लक्ष्मण पाटील व त्यांच्या चार कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवगड पोलिस करीत आहेत.