Mon, Sep 28, 2020 13:52होमपेज › Konkan › कशेडी घाटात कार ५० फूट दरीत कोसळली, तिघे किरकोळ जखमी!

कशेडी घाटात कार ५० फूट दरीत कोसळली, तिघे किरकोळ जखमी!

Published On: May 18 2018 12:11PM | Last Updated: May 18 2018 12:11PMपोलादपूर : धनराज गोपाळ

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार सुमारे ५० फूट दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी ७.३० वाजता भोगाव हद्दीत येलंगेवाडी जवळ घडली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कार चालक हशिम हसन ममतुले (वय ४२) हे आपली कार (क्र. एमएच ०२ बीपी ५४३६) घेऊन मुंबई ते चिपळूण असे जात होते. यावेळी कशेडी घाटात भोगाव हद्दीत आले असता एका अवघड वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार सुमारे ५० फूट दरीत कोसळली. या कारमधून ५ जण प्रवास करत होते. त्यांची पत्नी मासमीन हसन ममतुले, मुलगी अकसा हसन ममतुले (वय ७) व दिलावर नरुद्दीन सालास्कर हे ३ जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी टळली आहे.  

या अपघाताची खबर मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पो.ना.थोरात चव्हाण, व तुकाराम पारधी यांनी घटना स्थळी धाव घेतली. याच वेळी पत्रकार धनराज गोपाळ व सुखदेव मोरे हे पळचिल येथे जात असताना अपघाताची भीषणता लक्षात घेऊन पोलिसांबरोबर दरीत उतरून दोरीच्या सहाय्याने जखमींना दरीतून बाहेर काढले. जगतगुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्ण वाहिकेस पाचारण करून जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघातात हसन यांची पत्नी मासमीन यांच्या डोक्याला तर मुलगी आक्स हिच्या हाताला दुखापत झाली आहे.