Mon, Aug 03, 2020 15:12होमपेज › Konkan › ढोल-ताशांच्या गजरात सिंधुदुर्ग राजाची मिरवणूक 

ढोल-ताशांच्या गजरात सिंधुदुर्ग राजाची मिरवणूक 

Published On: Sep 12 2019 3:25PM | Last Updated: Sep 12 2019 8:44PM
कुडाळ : शहर वार्ताहर  

कुडाळ येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक ढोलताशांच्या गजरात भक्तीमय वातावरणात कुडाळवरून मालवणच्या दिशेने निघाली आहे. या विसर्जन मिरवणुकीमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले आहेत. मालवण येथे श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

कुडाळ येथे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक आज गुरुवारी कुडाळ वरून निघाली. कुडाळ शहरासह पावशीत भाविकांनी स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले. या मिरवणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, स्वाभिमान तालुका अध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक आबा धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, आनंद शिरवलकर, महीला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, महिला व बालकल्याण सभापती सौ. साक्षी सावंत, सौ. अस्मिता बांदेकर, नगरसेवक राकेश कांदे, रूपेश कानडे, सौ. रेवती राणे, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, दामू तोडणकर, राजवीर पाटील, भूषण राणे आदींसह पदाधिकारी व गणेशक्त सहभागी झाले आहेत.

ही विसर्जन मिरवणूक सिंधुदुर्ग राजाच्या दरबारातून निघून पावशी, पणदूर, ओरोस, सुकळवाड मार्गे मालवणच्या दिशेने जाणार आहे. ठिकठिकाणी भाविक श्रींचे दर्शन घेणार आहेत.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी  कणकवली–देवगड-वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सौ. सायली मांजरेकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. साक्षी सावंत, आरोग्य सभापती सौ. अश्विनी गावडे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी बांधकाम सभापती सुनील बांदेकर, आनंद शिरवलकर, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, अनिल कुडपकर, सौ. रेवती राणे, राजेंद्र राणे , रामा मांजरेकर, अमित राणे, बाबू सावंत, घाडीगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.