Wed, Aug 12, 2020 08:48होमपेज › Konkan › अभिजित पाटणकर खून; तिघांना जन्मठेप

अभिजित पाटणकर खून; तिघांना जन्मठेप

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 11 2017 11:16PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या अभिजित पाटणकर खून प्रकरणात चारही आरोपींना दोषी ठरवत सोमवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मोईन काझीसह फुजेल अहमदमियाँ काझी आणि रियाज हुसेन नदाफ या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चौथा आरोपी आसिफ कलीम खान याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

दोन वर्षांपूर्वी रत्नागिरीतील बांधकाम ठेकेदार अभिजित पाटणकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8 वा.च्या सुमारास तालुक्यातील पोमेंडी येथील रेल्वेपुलाखाली गटारात अभिजित शिवाजी पाटणकर यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने पूजेचे साहित्य आणण्यासाठी अभिजित 29 ऑगस्ट 2015 रोजी सायं. 7 वा.च्या सुमारास घरातून बाहेर पडले होते.