Sun, Sep 20, 2020 04:23होमपेज › Konkan › कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत

Last Updated: Sep 17 2020 2:12AM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावर मडुरे तसेच पेडणे दरम्याच्या टनेललगतच्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने जवळपास महिनाभर या ठिकाणापासून पुढील मार्गावर बंद असलेली रेल्वे वाहतूक मंगळवारी रात्री पूर्ववत झाली आहे. यामुळे या मार्गावर या घटनेपूर्वी धावत असलेल्या सहा गाड्या पुन्हा कोकण रेल्वे मार्गावरून धावू लागल्या आहेत.

 ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पेडणे बोगद्यानजीकची संरक्षक भिंत कोसळल्याने दुरुस्तीसाठी या ठिकाणापासूनची मडगावच्या दिशेने होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका गणेशोत्सवासाठी गावी येणार्‍या चाकरमान्यांनाही बसला. यामुळे गणेशोत्सव कालावधीत  रेल्वेला सावंतवाडी तसेच रत्नागिरीपर्यंच विशेष रेल्वे गाड्या सोडाव्या लागल्या  होत्या. मंगळवारी रात्री 10  वा.  टॅ्रक वाहतुकीकरिता योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही वाहतूक पूर्वपदावर आली. यानुसार आता एर्नाकुलम- निझामुद्दीन  (02617), निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्स्प्रेस (02618) ,  निजामुद्दीन - एर्नाकुलम दुरंतो (02284),  एर्नाकुमल - निजामुद्दीन (02283),  नवी दिल्‍ली तिरुअनंतपुरम (02432) राजधानी एक्स्प्रेस,  तिरुअनंतपुरम - नवी दिल्‍ली (02431) तसेच लो. टिळक टर्मिनस ते  तिरुअनंतपुरम (06345/46) या विशेष गाड्या पुन्हा या मार्गे धावू लागल्या आहेत. संरक्षक भिंत कोसळल्यानंतर या गाड्या पर्यायीमार्गे वळवण्यात आल्या होत्या.

 "