Wed, Jul 15, 2020 16:31होमपेज › Konkan › रत्नागिरीत सैन्यभरतीला पावणेचार हजार उमेदवार

रत्नागिरीत सैन्यभरतीला पावणेचार हजार उमेदवार

Last Updated: Nov 18 2019 8:57AM

संग्रहित छायाचित्ररत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहरात सुरु असलेल्या सैन्यभरतीला पहिल्या दिवशी पावणेचार हजार उमेदवारांची नोंद झाली. त्यामध्ये बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता. रात्री बारा वाजता सुरु झालेली प्रक्रिया सकाळी सहा वाजता संपली. उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी मारुती मंदिर सर्कल येथे उमेदवारांना मोफत खिचडीभात केंद्र सामाजिक संस्थानी सुरु केले होते. त्याचा लाभ हजारो उमेदवारांनी घेतला.

येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सैन्य भरतीची प्रक्रिया शनिवारी रात्री बारा वाजता सुरु झाली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांची कागदोपत्री तपासणी यावेळी करण्यात आली. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात आली. 1600 मीटरचे अंतर साडेपाच मिनिटांमध्ये पूर्ण करणार्‍यांची निवड करण्यात आली. पहिल्या दिवशी 3,748 उमेदवारांची सैन्यभरतीसाठी नोंदणी झाली. त्यातील धावण्याच्या चाचणीसाठी 2,745 उमेदवार निवडले गेले. त्यांच्यापैकी 217 उमेदवार पात्र ठरले असून त्यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे. धावण्याची चाचणीसाठी दोनशे ते अडीचशे मुलांचे ग्रुप तयार करुन सोडण्यात येत होती. या प्रक्रियेसाठी सैन्यदलाचे अधिकारी दाखल झाले असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याचा काळजी घेण्यात येत होती.

क्रीडांगणाजवळ मारुती मंदिर सर्कल येथे उमेदवारांना मोफत खिचडीभात केंद्र सुरु केले होते. याचा लाभ सुमारे पावणेचार हजार उमेदवारांनी घेतला. या सोयीबद्दल आलेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

भरतीसाठी आलेल्या काही तरुणांनी स्थानिक विकलांकडून केलेली नोटरी भरतीसाठी ग्राह्य धरण्यात आली नव्हती. यावरुन उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याबाबत स्थानिक वकिलांनी सैनिक कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला. परंतु ती ग्राह्य धरण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शेकडो उमेदवारांना माघारी परतावे लागले. याबाबत विचारविनीमय केल्यानंतर उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी स्थानिक वकिलांकडील नोटरी स्वीकारण्यास परवानगी दिल्याचे सैनिक कल्याण विभागाकडून सांगण्यता आले.