Sat, Oct 24, 2020 22:55होमपेज › Konkan › 'महाराष्ट्रात असा निष्क्रीय मुख्यमंत्री झाला नाही'

'महाराष्ट्रात असा निष्क्रीय मुख्यमंत्री झाला नाही'

Last Updated: Oct 20 2020 1:29AM

खासदार नारायण राणेकणकवली : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सरकारचा पायगुण चांगला नाही. सरकारची तिजोरी खाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये मदत देण्याच्या फक्‍त घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मदत नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला मदत द्यायला भाग पाडू. मुख्यमंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी आता बाहेर पडत आहेत, बाहेर पडून काय साधणार. असा सवाल विचारतानाच महाराष्ट्रात असा निष्क्रीय मुख्यमंत्री झाला नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी केली. 

कणकवली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खा.नारायण राणे यांनी सरकारवर निशाना साधला. ते म्हणाले,  सिंधुदुर्गात नव्या मेडिकल कॉलेजला मंजुरी ही जनतेची दिशाभूल आहे. राज्य सरकारला मेडिकल कॉलेजला परवानगी देण्याचे अधिकार आहेत का? केंद्रातील एनसीआरकडून मेडिकल कॉलेजला परवानगी दिली जाते.

अगोदर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुधारा. जनतेचे आरोग्य राखण्यासाठी सरकार हतबल ठरले आहे. जनतेने आपले संरक्षण करण्यासाठी कटिबध्द रहावे. या जिल्ह्यात कोरोनाचे बळी गेले त्याला कारण सरकारची आरोग्य व्यवस्था आहे. म्हणून मला वाटते विविध संस्थांनी पुढे येवून जनतेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे खा.राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा सोमवारी दौरा करणार आहेत.त्याचा उपयोग होणार नाही.त्यांना राज्याचा अभ्यास नाही,ते काय करु शकत नाहीत. त्यांना राज्यातील परिस्थितीचा अभ्यास नाही, अशी टीका खा.नारायण राणे यांनी केली. 

 "