Wed, Jan 27, 2021 08:46होमपेज › Konkan › केसरी बावळाट  खासगी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड : हजारो वृक्षांची कत्‍तल

केसरी बावळाट  खासगी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड : हजारो वृक्षांची कत्‍तल

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 9:18PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

केसरी बावळाट परिसरात खासगी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी सुमारे 100 एकरक्षेत्राचा पंचनामा सुरु असून आत्तापर्यत दोन सर्व्हे नंबरमधील सुमारे सातशे झाडे तोडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सावंतवाडी फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल संजय कदम यानी दिली.

ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरा कोल्हापूर वनविभागाच्या भरारी पथकाने कोल्हापूर वनविभागाचे अधिकारी प्रकाश बागेवाडी यांच्या नेतृत्वाखाली केली. यात जळावू  व कमी दर्जाचे लाकूड तोडून जप्त करण्यात आले आहे.  ही वृक्षतोड खाजगी क्षेत्रातील आहे. त्यामुळे त्याची खातरजमा करूनच पुढील कारवाई करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. वृक्षतोड झालेल्या लाकडांचे मोजमाप सुरू आहे. सध्या सातशे झाडे तोडल्याची माहिती मिळाली असून हे  लाकूड जप्त करण्यात आले आहे.

 केसरी - धांडे, बावळट या  भागात  मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याची माहिती या कोल्हापूरच्या भरारी  पथकाला मिळाली असता  त्यांनी आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्यासह स्थानिक अधिकार्‍यांच्या वनपथकाच्या मदतीने सापळा रचून तोडलेल्या झाडांचा पंचनामा सुरू केला आहे.  उपवनसंरक्षक समाधान चव्हाण हे  सध्या मुंबईत आहे त्यामुळे माहिती देऊ शकत नाही. परंतु लाकूड पकडण्यात आले असून ते खासगी क्षेत्रातील आहे अशी  माहिती त्यांनी दिली. केसरीत वनविभागाच्या जमिनीत बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याबाबत कारवाई सुरू  असून येत्या दोन दिवसांत याबाबतची माहिती मिळणार आहे.

URL : Large number, deforestation, Kesari, Dhande, Bavlat, konkan news