Mon, Sep 21, 2020 17:09होमपेज › Konkan › आंबोलीच्या पर्यटनासाठी सर्वतोपरी मदत

आंबोलीच्या पर्यटनासाठी सर्वतोपरी मदत

Last Updated: Feb 15 2020 12:54AM
आंबोली : पुढारी वृत्तसेवा

आंबोली वन उद्यानमधील फुलपाखरू उद्यानाचे व वन विभागाच्या विश्रामगृहाचे लोकार्पण राज्याचे वनमंत्री संजय राठोड व आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोलीतील समृद्ध निसर्ग व जैवविविधता पाहता आंबोलीच्या पर्यटन विकासासाठी सर्व ती मदत आपण करू, अशी ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

आंबोलीच्या पर्यटनवाढीसाठी चार वर्षांपूवीर्र् येथील वन उद्यान जागेत  फुलपाखरू उद्यान तयार करण्याची घोषणा माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी केली होती. गेल्या 2 वर्षांत  यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजनेतून येथे सुमारे 42 लाख रु. खर्च करून हे  फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. तसेच,  सुमारे 42 लाख रु. खर्च करून या वनउद्यान जवळ नव्याने स्वतंत्र विश्रामगृह ही 42 बांधण्यात आले आहे. या फुलपाखरू उद्यानाचे व विश्रामगृहाचे लोकार्पण शुक्रवारी वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

आंबोली परिसरातील जंगलात सुमारे 210 पेक्षा जास्त जातीची दुर्मीळ व अतिदुर्मीळ फुलपाखारे आढळून येतात. या फुलपाखरांच्या अभ्यासासाठी देशभरातून अभ्यासक व फोटोग्राफर्स येत असतात. तसेच येथे जैवविविधता असल्याने निसर्गप्रेमी सुद्धा मोठ्या संख्येने भेट देतात.  या सर्वाचा आंबोलीच्या   पर्यटन विकासासाठी फायदा व्हावा,  यासाठी हे प्रशस्त फुलपाखरू उद्यान तयार तयार करण्यात आल्याने ना. राठोड यांनी सांगितले. या उद्यानात अभ्यासक व पर्यटकांसाठी बाराही महिने फुलपाखरे पाहायला मिळतील, असे ते म्हणाले.   या फुलपाखरू उद्यानात फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विविध जातीची झाडे लावण्यात आली आहेत. फुलपाखरांच्या अंडी, अळी, कोष  आणि फुलपाखरू अशा चारही अवस्था पाहायला व अभ्यासायला मिळणार आहेत.  या उद्यानात फुलपाखरांसाठी विशेष अधिवास तयार करण्यात आला आहे. वनविभागाच्या पूर्वीच्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करुण नवीन इमारत बांधण्यात आली आहे. यामुळे येथील पर्यटनात निश्चितच वाढ होईल असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहायक उपवनसंरक्षक  इ. दा. जळगावकर, आंबोलीचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, आंबोली सरपंच रोहिणी पारधी, उपसरपंच विलास गावडे, चौकुळ माजी सरपंच विजय गावडे, विद्यासागर गावडे, अरूण गावडे, आंबोली वनपाल व सर्व वनकर्मचारी उपस्थित होते.

 "