दापोली : मुरूड समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा

Last Updated: Jan 22 2020 6:41PM
Responsive image


दापोली : पुढारी वृत्तसेवा

दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर बुधवार (ता.२२) एक व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती येथील लाईफ गार्ड राजेश शिगवण यांनी सरपंच सुरेश तुपे यांना दिली. त्यानंतर त्यांनी दापोली पोलिस ठाणे आणि दापोली वनविभागाला याबाबत कळविले. 

अधिक वाचा : रत्नागिरी : पहिली आंबा पेटी दापोलीतून रवाना

याव्हेल माशाची लांबी ५७ फूट इतकी आहे. वजन अंदाजे पाच टनच्या आसपास आहे. हा मासा अंदाजे आठ वर्ष वयाचा असावा असा अंदाज पशुधन विकास अधिकारी विवेक पनवेलकर यांनी यावेळी वर्तविला. या प्रकारच्या माशांची शंभर फुटापर्यंत उंची वाढते. अशाप्रकारे मोठे व्हेल मासे खोल समुद्रात आढळतात. या माशाला मालवाहतूक जहाजाचा धक्का बसल्याने तो मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे. 

अधिक वाचा : 'नाईटलाईफ'चा घाट कोणाचा बालहट्ट पुरविण्यासाठी?; प्रवीण दरेकरांचा सवाल 

या व्हेल माशाच्या मृत्यूमुळे  दुर्गंधी पसरली होती. या माशाचीवरील कातडी कुजली होती. तर माश्याच्या मागील भागाचे तुकडे झाले होते. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाचे दापोली वनक्षेत्रपाल वैभव बोराटे, वनपाल गणेश खेडेकर, वनरक्षक महादेव पाटील,सुरेखा जगताप समुद्र किनारी घटनास्थळी पोहोचले. या वेळी जेसीबीच्या साह्याने या माशाला पुरण्यात आले. मागील दोन वर्षां पूर्वी देखील करदे समुद्र किनारी असाच  मृत व्हेल मासा आला होता.

सुमारे पंधरा दिवसा पूर्वी या व्हेल माशाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.  याची चरबी अधिक दिवस वितळत नाही. जहाजाच्या धक्क्याने, प्रदूषणामुळे, कुटुंबापासून अलिप्त होत, किंवा भक्षाचा पाठलाग करताना खोल समुद्रातून बाहेर येऊन या माशाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
- विवेक पनवेलकर:- पशुधन अधिकारी