Wed, Aug 12, 2020 09:47होमपेज › Konkan › रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी (video)

रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी (video)

Last Updated: Jun 16 2020 2:03PM
रायगड : पुढारी वृत्तसेवा 

निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या मालमत्ता, फळबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकाचे रायगड जिल्हयात आगमन झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पाहणी करुन त्यांचा अहवाल या पथकामार्फत केंद्राला दिला जाणार आहे. 

अधिक वाचा : कोकणच्या 5 जिल्ह्यांत 24 हजार 500 कंपन्या सुरू

निसर्ग चक्री वादळ ३ जून रोजी कोकण किनारपट्टीला धडकले होते. या वादळाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील परिसरात मोठी हानी झाली होती. या वादळामध्ये येथील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. यासह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटामुळे अनेक गावे उध्वस्त झाल्याचे चित्र होते. या वादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन १०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भागाची पाहणी करत शासनाकडून जाहीर झालेली मदत तोकडी असल्याची टिका ठाकरे सरकारवर केली होती. 

अधिक वाचा : आणखी तेरा नवे रुग्ण

यासर्व राजकीय नाट्यानंतर कोकण पट्ट्यातील झालेल्या नुकासानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकाचे रायगड जिल्हयात आगमन झाले आहे. या पथकामध्ये रमेशकुमार गंटा (भाप्रसे), सहसचिव (प्रशासन व सीबीटी), एनडीएमच, एमएचए, नवी दिल्ली, आर. बी. कौल, सल्लागार अर्थ मंत्रालय (खर्च), नवी दिल्ली, एल.आर.एल.के.प्रसाद, संचालक, उर्जा मंत्रालय, सीईए, नवी दिल्ली, एस.एस.मोदी, उपसचिव, ग्रामीण विकास, नवी दिल्ली, आर. पी. सिंग, संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर, तुषार व्यास, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग, मुंबई यांचा समावेश आहे. 

अधिक वाचा : आगामी तीन दिवस मुसळधार

या पथकाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून जाणून घेतली. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती पथकाला देण्यात आली. यानंतर हे केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागास प्रत्यक्ष जाऊन भेट देणार आहे.