Wed, Jul 08, 2020 06:43होमपेज › Konkan › रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर झाड कोसळले 

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर झाड कोसळले 

Last Updated: Jun 03 2020 11:59AM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा 

नाणीजजवळील नवीन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने वृक्ष आज सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला. अजस्त्र वृक्ष पडल्याने रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूकीचा अर्धा तास खोळंबा झाला. याची माहिती मिळताच नाणीज तलाठी मिस्त्री घटनास्थळी त्वरीत पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पडलेल्या वृक्ष बाजूला केला. वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

कोकण #CycloneNisarga LIVE : सिंधुदुर्गात मुसळधार; मालवण, वेंगुर्ले, देवगडात वाऱ्याचा वेग वाढला

सध्या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अनेक ठिकाणी असे जुनाट आणि धोकादायक वृक्ष आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. फक्त चक्रीवादळाच्या दिवशीच नव्हे तर संपूर्ण पावसाळाभर ही दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.