Wed, Aug 12, 2020 09:39होमपेज › Konkan › गणपतीपुळे : जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान (video)

गणपतीपुळे : जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान (video)

Last Updated: Jul 06 2020 4:00PM

 गणपतीपुळे येथे जाळ्यात अडकलेले कासव रत्नागिरी : पुढारी वृत्‍तसेवा

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थानच्या कर्मचार्‍यांनी जीवदान दिल्याची घटना सोमवारी घडली.

वाचा : वादळग्रस्तांसाठी ११६ कोटी प्राप्‍त 

सोमवारी सकाळी गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. यावेळी त्यांना मंदिरासमोरील समुद्रकिनारी असणाऱ्या मासेमारी जाळ्याच्या मोठ्या तुकड्यात एक कासव अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ समुद्रकिनारी धाव घेतली. एक ते दोन फूट लांबीचे आणि सुमारे १५ किलो वजनाचे कासव जाळ्यात अडकले होते. यानंतर या कर्मचाऱ्यांनी धावाधाव करत कोयत्याच्या सहाय्याने जाळे तोडून कासवाची सुटका केली. यानंतर देवस्थानच्या कर्मचारी आणि स्थानिकांनी कासवाला उचलून पुन्हा समुद्रात सोडले. यात सुदैवाने कासवाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याने सांगितले आहे. 

वाचा : दोघांचा मृत्यू ; २४ तासांत १४ नवे रुग्ण

ही कामगिरी राकेश सुर्वे, मिथून माने, अमोल गुरव, सागर लिंगायत आणि अन्य स्थानिकांनी केली आहे.त्यांच्या या कार्याबद्दल गणपतीपुळे ग्रामस्थांकडून सर्वांचे कौतुक होत आहे.