Thu, Aug 06, 2020 04:05होमपेज › Konkan › रस्त्यांसाठी १४ कोटींच्या निधीची तरतूद

रस्त्यांसाठी १४ कोटींच्या निधीची तरतूद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : हरिश्‍चंद्र पवार

सिंधुदुर्गातील सा.बां.च्या रस्त्यांच्या कामांसाठी 13 कोटी 54 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असली तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला यातून 8 कोटी  96 लाख  58 हजार रुपयांच्या कामाना मंजुरी मिळाली आहे.

कणकवली, कुडाळ, मालवण, वैभववाडी, देवगड आदी तालुक्यांनाही पालकमंत्री ना. केसरकर यांनी रस्ता दुुरुस्ती व रस्ता कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असून या सर्व विकासनिधीतून जिल्ह्यातील सेनेची आगामी 2019 च्या निवडणुकांची तयारीच सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ले तालुक्यातील रस्ते बांधणी शीघ्रगतीने होताना दिसत आहे.  या वर्षात सिंधुदुर्गवासियांसाठी सुंदर रस्ते, पूल व दळणवळणातील प्रगती प्रत्यक्ष दिसेल, असा विश्‍वास कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी व्यक्‍त केला आहे.

जिल्ह्यात एकूण 78 कोटी रुपयांच्या रस्ता कामांना मंजुरी मिळाली आहे.सा.बां.खात्यांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षात 78 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला  13 कोटी  54 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुर्दशा झाली होती.सा.बां.खात्यांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील व ना.दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने पुढे दिलेल्या रस्त्याच्या कामांसाठी 78 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सुरुवातीला 13 कोटी 54 लाख 56 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे ही सर्व कामे कंत्राटदारांनी केल्यानंतर त्याने दोन वर्षे देखभाल दुरुस्ती करायची आहे. अशी अट घालण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुक्याला जोडणार्‍या सह्याद्री घाट मार्गासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.यात कनेडी, कुपवडे, शिवापूर कलंबिस्त, सांगेली, धवडकी, दाणोली, बांदा रस्त्यासाठी 24,62,000रु.,बुर्डी कारिवडे सावंतवाडी आरोंदा रेडी रस्त्यासाठी 95,18,000 रु. मुख्यमंत्री ग्रामसडकसाठी मंजूर करण्यात आले आहेत.शिवाय वेंगुर्ला,आकेरी, बेळगाव रस्ता 8,37,000 रु., माडखोल कारिवडे चराठा इन्सुली पांगावाडी रस्ता 13,85,000 रु., दाणोली, केसरी, फणसवडे, चौकुळ - नेनेवाडी आंबोली रस्ता 34,54,000 रु,, सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडातिठा ते रेड्डी तेरेखोल रस्ता 13,28,000 रु.मंजूर करण्यात आले आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील  तिलारी घोडगेवाडी मोर्ले पारगड रस्ता 68,18,000 रु., माडखोल कारिवडे चराठा पागावाडी रस्ता 41,81,000 रु.मंजूर  केले आहेत.वेंगुर्ला तालुक्याला निधीची तरतूद करताना वेंगुर्ला आंबोली बेळगाव रस्त्याला 45,13,000 रु., वेंगुर्ला-आंबोली-बेळगाव रस्ता 14,30,000रु., उभादांडा मूठ 9,99,000 रु., वेंगुर्ला तुळस सावंतवाडी  14,77,000 रु. मंजूर केले आहेत. मालवण तालुक्याला निधीची तरतूद करताना बोडी, ठाणे, न्हावा -शेवा, रेवस, विजयदुर्ग, वेंगुर्ला शिरोडा, सातार्डापर्यत  रस्त्यासाठी 56,29,000 रु.,वराड महाळुंगेवाडी तळगाव पुलाचे बांधकाम करण्यासाठी 21,13,000, रु.,कोणी आसरोंडी 7,56,000 रु. चिंदर-कुडोपी बुधवळे 7,86,000 रु.,लिंगडाळ, आरे-निरोम मठ बु.-बुधवळे, पळसंब 15,36,000 रु. काळसे,वडार, पेंडूर कट्टा,गुरामवाड,गोळवण,वडाचे पाट, मसुरे कावा रस्त्यासाठी 25,80,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे 

वेंगुर्ला-कुडाळ तालुक्यातील वेंगुर्ला मठ, कुडाळ-पणदूर घोडगे रस्त्यासाठी 23,63,000रु.अणाव घाटचेपेड ते मांजरेकर वाडीसाठी 43,34,000 रु., सुकळवाड, अणाव, पणदूर  74,1,000रु.,कनेडी, कुपवडे, शिवापूर, शिरशिंगे, कलंबिस्त, सांगेली, धवडकी, दाणोली, बांदा रस्ता 35,28,000 रु,तर वागदे, तळवडे, आंब्रड, कुंदे, पोखरण, कसाल रस्त्यासाठी 83 लाख रु,राठिवडे,हिवाळे, ओवळीये, ओसरगाव,  कळसुलीसाठी 15,12,000 रु,वागदे, हळवल, कसवण, तळवडे, आंब्रड, कुंदे, पोखरण, कसाल रस्त्यासाठी 5,93,000 रु, कुडाळ, मालवण, चौके , धामापूर, कुडाळ रस्त्यासाठी 2,87,68,000 रु.मंजूर करण्यात आले आहेत.

देवगड तालुक्यासाठी आंबेरी, पडेल,जामसंडे, इळये, कुणकेश्‍वर, आचरापार रस्त्यासाठी  2,20,81,000 रु मंजूर झाले आहेत.कणकवली तालुक्यातील करूळ,नावळे सडुरे, कुर्ली- घोणसरी फोंडा रस्त्यासाठी 27,57,000 रु मंजूर करण्यात आले आहेत.वैभववाडी तालुक्यासाठी निधीची तरतूद करताना तिथवली, भुईबावडा, गगनबावडा रस्त्यासाठी 55,79,000रु, धालवल, कोर्ले,वारगाव, नाधवडे, कोकिसरे, खांबाळे रस्त्यासाठी 11,27,000 रु. निधीची तरतूद करण्यात आली आहे.


  •