Mon, Aug 10, 2020 04:51होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात 20 नवे रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात 20 नवे रुग्ण

Last Updated: Jun 29 2020 10:13PM

संग्रहित छायाचित्ररत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गेल्या चोवीस तासात 20 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून, कोरोनाबाधितांची संख्या 580 वर गेली आहे. सोमवारी सातजण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले. बरे झालेल्यांची संख्या 437 आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दोन नवजात बालकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे एका कैद्याला व तुरुंग पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे.

कोविड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 3 तर समाजकल्याण, रत्नागिरी  येथून 1 अशा जिल्हा रुग्णालय 1 आणि पेढांबे येथून 2 असे एकूण 7  रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे.

रविवारी सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शिरगाव रत्नागिरी-3, जेल रोड रत्नागिरी-2, मालगुंड रत्नागिरी -1, गावडे 
आंबेरे रत्नागिरी-1, राजिवडा ता. रत्नागिरी-1, घरडा कॉलनी लवेल खेड-6, कुंभारवाडा खेड-1, पायरवाडी कापसाळ चिपळूण-2, पेठमाप चिपळूण-1, गोवळकोट  चिपळूण-1, जुनी कोळकेवाडी चिपळूण-1 येथील रुग्णांचा समावेश आहे.  सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 119  असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सोमवारी रत्नागिरी तालुक्यातील  साळवी स्टॉप,  उद्यमनगर, मारुतीमंदीर,चर्मालय, भाटये, तिवंडेवाडी शिरगाव, बौध्दवाडी- मिरजोळे, ही सात क्षेत्रे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.  तसेच नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, झाडगाव नाका, मौजे साखरतर, मौजे मेर्वी, मौजे धामणसे, मौजे नरबे, मौजे लाजूळ, मौजे देवूड, मौजे उक्षी, मौजे नाणीज, मौजे भंडारपुळे,मौजे करबुडे कोंड, मौजे कशेळी, राजिवडा, मौजे नाचणे शांतीनगर, मौजे गणेशगुळे, ता.जि. रत्नागिरी या भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कन्टेनमेंट झोनचा कालावधी पूर्ण झाला. यामुळे या भागाच्या सिमा पूर्ववत करण्यात आल्या.  जिल्ह्यात सध्या 45 क्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 17 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये   01, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 5 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 8 गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

मुंबईसह एम. एम. आर. क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून  20 हजार 189 इतक्या जणांनी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला असून त्यांना  गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 9 हजार 410 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 9 हजार 156 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 580 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 8 हजार 541 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 254 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. हे अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. 

दोन नवजात बालकांना लागण

जिल्ह्यामध्ये आता जिल्हा रुग्णालय परिसरातच अन्य रुग्णांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या पाच गर्भवतींपैकी दोघींची प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या नवजात बालकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.