Sat, Sep 19, 2020 11:06होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात नवे 152 बाधित

रत्नागिरी जिल्ह्यात नवे 152 बाधित

Last Updated: Sep 17 2020 2:12AM
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांत नवे 152 रुग्ण आढळून आले असून, यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 6 हजार 297 वर गेला आहे. तर मागील चार दिवसांत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे मृतांचा आकडा 187 वर गेला असून जिल्ह्यात मृतांची सरासरी 2.96 टक्क्यांवर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पाहणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान आणखीन चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद 16 सप्टेंबर रोजीच्या यादीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा बुधवारी पाचवर गेल्याने एकूण आकडा 187 वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत 152 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये स्वॅब टेस्टमध्ये 8666 रुग्ण आढळून आले असून त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा सहा हजार 297 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात चार हजार 647 व्यक्‍तींना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे.

 "