Thu, Sep 24, 2020 08:00होमपेज › Kolhapur › कुरुंदवाड : पाण्‍यासाठी नागरिकांची वणवण; टँकरने पाणीपुरवठा 

कुरुंदवाड : पाण्‍यासाठी नागरिकांची वणवण 

Published On: May 09 2018 1:45PM | Last Updated: May 09 2018 1:45PMमहिलांची पाण्‍यासाठी झुंबड 

कुरुंदवाड : प्रतिनिधी

येथील दलित वस्तीत पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. त्‍यामुळे दलित वस्तीत  टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्‍यात आला. 

येथील पालिकेचे उपनगराध्यक्ष अक्षय आलासे यांच्या प्रभागातच पाणीपुरवठा न झाला नाही. त्‍यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. या भागात पाणीपुरवठा न झाल्याने आज सकाळी आठच्या सुमारास टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी पाणी घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती.

दलित वस्तीतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षे अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. पाण्यासाठी अनेक वर्षे वणवण करावी लागली होती. माजी नगराध्यक्ष कै.सुरेश कडाळे यांनी आपल्या दलित वस्तीला पाणी कमी पडू नये यासाठी येथील गोठणपूर उद्यानात दीड वर्षांपूर्वी नवीन टाकी बांधली होती. मात्र, पाणीपुरवठ्याच्या नियोजनाअभावी या वस्तीतील नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे.