Sun, Jan 19, 2020 15:24होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : पंचगंगा इशारा पातळीखाली 

कोल्हापूर : पंचगंगा इशारा पातळीखाली 

Published On: Sep 11 2019 10:56AM | Last Updated: Sep 11 2019 10:56AM

पंचगंगा नदीकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांत वाढलेली पंचगंगा नदीतील पाणीपातळी आता कमी झाली आहे. सध्या पंचगंगेची पातळी इशारा पातळीखाली गेली आहे. सकाळी १० वाजता पाणीपातळी ३८.१० फुटांपर्यंत खाली आली. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे.

सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत घट होत आहे. गेल्या काही दिवसांत पंचगंगेसह जिल्ह्यांतील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून प्रयाग चिखली, आंबेवाडी (ता. करवीर) येथील २५० कुटुंबांतील ३९० जण तसेच ४५० जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.

यासह शिरोळमधील गोठणपूर (कुरुंदवाड), राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर या ४ गावांतील ९७ कुटुंबांतील ३७५ व्यक्‍तींचे प्रशासनाच्या वतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते.