Mon, Sep 21, 2020 11:24होमपेज › Kolhapur › कोल्हापूर शहरात पूरस्थिती (video)

कोल्हापूर शहरात पूरस्थिती (video)

Last Updated: Aug 05 2020 3:34PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने पंचगंगेचेसह शहरातील नाल्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. शहरातील शाहूपुरी, कुंभार गल्ली, रामानंद नगर परिसरात पाणी शिरले. दुकाने, घरात पाणी घुसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. घरातील साहित्य, गणेश मुर्ती सुरक्षितस्थळी हलवताना त्यांची धावपळ उडाली. अवघ्या दिवसभराच्या पावसाने शहराच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कळंबा आणि रंकाळा तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पावसाची संततधार सुरु आहे. या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी बुधवारी (दि.५) रोजी सकाळी पात्राबाहेर पडले. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रात्रीत तब्बल नऊ फूट पाणी पातळी वाढली. धुवांधार पावसामुळे जिल्ह्यातील ९० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहेत. अजून ४८ तास संततधार पाऊस पडणार असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागासह आजरा, गडहिंग्लज तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. बुधवारी हिरण्यकेशी व घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या भागातील ओढे-नालेही तुडूंब भरून वाहू लागले आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशीवरील भडगाव पूल पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. यामुळे गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

 

 "