Mon, Sep 21, 2020 12:47होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कोवाड बंधारा पाण्याखाली, बाजारपेठेत पाणी शिरले 

कोल्हापूर : कोवाड बंधारा पाण्याखाली, बाजारपेठेत पाणी शिरले 

Last Updated: Aug 05 2020 3:23PM

संग्रहीत छायाचित्रकोवाड : पुढारी वृत्तसेवा

चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोवाड बाजारपेठेत पाणी घुसले. यामुळे व्यापारी लोकांची तारांबळ उडाली. रात्री पावसाचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील काही दुकानात पाणी गेल्याने व्यापारी दुकानातील माल काढण्यात व्यस्त होते. तर काही दुकानात पाणी जाऊन मालाचे नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

गतवर्षी याच आठवड्यात महापूर येऊन पूर्ण बाजारपेठेचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांचीच पुनरावृत्ती होत असल्याने कोवाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोवाड-किणी स्टँडवर पाणी आल्याने वाहतूक बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे कोवाड येथील कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे कर्यादी भागातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने भात व ऊस पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जर असाच पाऊसाचा जोर राहिल्यास गतवर्षीची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे कोवाड पंचक्रोशीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

 "