Thu, Feb 20, 2020 20:00होमपेज › Kolhapur › 8 वर्षे आमदार राहिलेल्या महाडिकांचे राजकीय कर्तृत्व काय ?

8 वर्षे आमदार राहिलेल्या महाडिकांचे राजकीय कर्तृत्व काय ?

Published On: Oct 04 2019 1:47AM | Last Updated: Oct 04 2019 12:51AM
  
कोल्हापूर  ः प्रतिनिधी 

महाडिकांनी पैसा व सत्तेच्या जोरावर लोकांना खिशात घालून भेसळीचे राजकारण केले. 18 वर्षे आमदार म्हणून राहिलेल्या महाडिकांचे राजकीय कर्तृत्व काय, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ वडकशिवाले (ता. करवीर) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

आमदार पाटील म्हणाले, महाडिक कंपनी स्वतःचे काळे धंदे वाचवण्यासाठीच सत्तेचा वापर केला.  गावचा सरपंच आपल्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामाचा हिशेब देतो; मात्र 18 वर्षे आमदारकीची खुर्ची उबवणार्‍या महाडिकांनी काय दिवे लावले? त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा एकही प्रश्न सोडवला नाही. अवधूत पाटील म्हणाले, भाजप हा पदांचे गाजर दाखवणारा पक्ष आहे. सचिन पाटील म्हणाले, महाडिक

स्वार्थासाठी काम करतात. यावेळी एन. एम. पाटील, युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वडकशिवालेचे माजी सरपंच कृष्णात पाटील, अमर पारळे, श्रीधर पाटील, अभिजित देवकुळे, मारुती पाटील, चुयेचे माजी सरपंच हिंदुराव पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.