Sat, Feb 29, 2020 11:50होमपेज › Kolhapur › ‘वंचित’ कोणाला देणार धक्का?

‘वंचित’ कोणाला देणार धक्का?

Published On: Oct 03 2019 2:10AM | Last Updated: Oct 02 2019 10:44PM
कोल्हापूर : संग्राम घुणके

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपली चुणूक दाखवली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 4 टक्के व हातकणंगलेत तब्बल 10 टक्के मतदान घेत प्रस्थापितांना धक्का दिला. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातून अनेक मातब्बर ‘वंचित’ची उमेदवारी घेत निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळे अनेक दिग्गजांनी ‘वंचित’चा धसका घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित कोणाला धक्का देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

वंचित बहुजन आघाडीची मे 2018 मध्ये स्थापना झाली. संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी विचारसरणी असलेल्या या पक्षाकडे राज्यातील सत्तेपासून वंचित असलेला वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला. परिणामी, प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांत घट होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या राजकारणाला स्थानिक गट, सहकारी संस्थांतील राजकारण असे अनेक पदर असतात. गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नव्हती. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या नव्या पक्षाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ‘वंचित’च्या डॉ. अरुणा माळी यांनी तब्बल 63 हजार 439 मते मिळविली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 387 इतकी मते मिळाली. विधानसभेसाठी जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे साखर सम—ाट, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, गोकुळचे संचालक अशा मातब्बर उमेदवारांनी मागणी केली असून यामधील बहुतांशी इच्छुकांची उमेदवारी निश्चित आहे. 

गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बहुसंख्य विधानसभा मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत लढत झाली. राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, शाहूवाडी-पन्हाळा यासह अनेक मतदारसंघांत निवडणुकीत  प्रचंड चुरस असते. काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत दोन तुल्यबळ उमेदवारांचे मताधिक्य काही हजारांत होते. गत निवडणुकीत तर करवीर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचे मताधिक्य शेकड्यात आले आहे. 

या पार्श्वभूमीवरच सर्वच मतदारसंघात ‘वंचित’कडे मतदार मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यामुळे वंचितच्या उमेदवारांचा अनेकांना धक्का बसणार हे मात्र निश्चित आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारांना विधानसभा मतदासंघनिहाय पडलेली मते

डॉ. अरुणा माळी (कोल्हापूर  मतदारसंघ) विधानसभा मतदारसंघ - पडलेली मते

चंदगड-     7,896

राधानगरी-    10,444अस्लम सय्यद (हातकणंगले  मतदारसंघ) विधानसभा मतदारसंघ -  पडलेली मते

शाहूवाडी -     14,587

हातकणंगले-     42,325

इचलकरंजी -    17,301

शिरोळ-     27,913

इस्लामपूर-    10,803

शिराळा-    10,222

कागल-    9833

कोल्हापूर दक्षिण-    11,373

करवीर-     16,522

कोल्हापूर उत्तर-     7,183