Mon, Feb 17, 2020 18:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत गोंधळ; महाडिक-पाटील गट आमने-सामने 

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत गोंधळ; महाडिक-पाटील गट आमने-सामने 

Published On: Sep 11 2019 12:17PM | Last Updated: Sep 11 2019 12:30PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आज गोंधळ झाला. या सभेदरम्यान महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट आमने- सामने आले. या सभेत एका गटाकडून पत्रकेही भिरकावण्यात आली. तर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

राजाराम कारखान्याचे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत १६७३४ अ वर्ग उत्पादक सभासद, तर १४२ ब वर्ग सहकारी संस्था सभासद आहेत. कारखान्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. मात्र, आ. सतेज पाटील गटाने अलीकडच्या काही वार्षिक सभांत चौफेर प्रश्‍नांचा भडीमार करत सत्ताधार्‍यांची कोंडी केली आहे.

आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही गोंधळ उडाला. महाडिक आणि पाटील यांचे कार्यकर्ते सभामंडपात आमने- सामने आले. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे गोंधळ उडाला.