कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. आज (दि. २३) सकाळी ८.३० वाजता आणखी २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २६१ वर पोहचली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ३१ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा अडीचशे पार करून २५९ वर गेला होता. एकट्या शाहूवाडी तालुक्यातील रुग्णांची संख्या ८१ पर्यंत गेली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल शाहूवाडी तालुक्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता आठ रुग्णांचे अहवाल आले होते. यापैकी शाहूवाडी तालुक्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासकीय नोंदीनुसार स्पष्ट झाले. मात्र, बाधित रुग्ण हा शाहूवाडी तालुक्यातील असून त्याने तपासणीदरम्यान बहिणीचा पत्ता दिल्याने त्याची नोंद कोल्हापूर शहरातील रुग्ण म्हणून झाली आहे.