Tue, Jan 21, 2020 12:09होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शस्त्र तस्करासह तिघांना अटक, सहा पिस्तुले जप्त 

कोल्हापूर : शस्त्र तस्करासह तिघांना अटक

Published On: Sep 11 2019 12:09PM | Last Updated: Sep 11 2019 12:21PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापूर येथील एका शस्त्र तस्करासह तिघांना अटक करून तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. टोळीकडून अत्याधुनिक पद्धतीचे सहा देशी पिस्तूल, अकरा काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.