Sat, Feb 29, 2020 11:39होमपेज › Kolhapur › राजू शेट्टींच्या चळवळीचे हात बळकट करण्यासाठी त्याने दिला आपला पहिला पगार

राजू शेट्टींच्या चळवळीचे हात बळकट करण्यासाठी त्याने दिला आपला पहिला पगार

Last Updated: Oct 27 2019 2:34PM

माजी खासदार राजू शेट्टीपुढारी ऑनलाईन डेस्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. राजू शेट्टींचा पराभव त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्याही खूप जिव्हारी लागला. राजू शेट्टींची पराभव झाल्यावर शेतकरी चळवळीला धक्का बसला ही चळवळ आता पुढे चालणार कशी यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. यावर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना एक भावनिक साद देत चळवळ टिकण्यासाठी तुमच्यासह आर्थिक तरतुदीची गरज आहे. 

यावर शेतकऱ्यांनी पुढाकार घेत राजू शेट्टींना पाच वर्ष राज्यभरात शेतकरी चळवळीला चालना देण्यासाठी फिरता येईल इतकी आर्थिक तरतूद शेतकऱ्यांनी एका दिवसातच केली. येथूनच चळवळ टिकली पाहिजे यावर टॅगलाईनवर सुरू झाली. शेतकरी कष्टकरी लोक आपल्याकडे जमणाऱ्या पैशातील काही भाग राजू शेट्टींच्या चळवळीला देऊ लागले याचाच एक प्रत्यय काल घडला.

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांचा मोठा मुलगा भुषण पाटील हा गोव्यातील नामवंत कृषी महाविद्यालय, सुलकोर्ना(गोवा) याठिकाणी प्राध्यापक म्हणून रूजू झाला. त्याने त्याच्या नोकरीतील पहिला पगार चळवळीसाठी म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे सुपुर्द केला. भुषणच्या मनात चळवळीबद्दलची असलेली ही प्रेरणा निश्चितच युवापिढीला दिशा देणारी आहे. असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट करत चळवळ टिकली पाहिजे आणि शेतकरी मोठा झाला पाहिजे याबाबत सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमध्ये सावकार मादनाईक यांचा पराभव झाला यामुळे पुन्हा चळवळ हरली पैसे जिंकला अशी चर्चा होती. 2004 साली राजू शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीला सुरुवात झाली यात अनेक आंदोलने करत त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस पिकाला दर जास्त मिळू शकतो याचे महत्व पटवून देऊन कारखानदारांना पैसे देण्यास भाग पाडले. 

कालांतराने शेट्टींनी राजकारणात कारखानदार यांच्याशीच गट्टी केल्यावर त्यांना पराभवाला समोर जावं लागलं. झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरुड मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार यांच्या रुपात आता विधानसभेत राजू शेट्टी यांच्या चळवळीला बळ देण्यासाठी कितपत आवाज उठवतात याबाबत पाहावं लागेल.